ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी विदेशी दारू व मोटर सायकलसह 1,18,700 रु चा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  दिनांक. 25/05/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन पो. स्टे. आष्टी हद्दीत अवैद्य धंदयावर कारवाई करीता पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन मिळालेल्या गोपणीय माहिती वरून यातील आरोपी. सुनिल शिवहरी निकम, वय 52 वर्ष, रा. साहुर, ता.आष्टी, जि वर्धा यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये रेड केला असता आरोपीचे ताब्यातून देशी विदेशी दारू व मोटर सायकल असा एकूण जू.किं.1,18,700/-रू चा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आला. आरोपीने दारूसाठा बाहेर जिल्ह्यातुन आणल्याने बार मालक यांना आरोपी करण्यात आले. आरोपी विरुद्ध पो. स्टे. आष्टी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो. स्टे. आष्टी येथील अंमलदार करीत आहे.

         सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, सचिन इंगोले, श्रीकांत खडसे, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, प्रदीप वाघ, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये