ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदेवाहीचे नवे तहसीलदार संदीप जी. पानमंद झाले रुजू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

  सिंदेवाही तालुक्याला मागील सहा महिन्यापासून स्थायी तहसीलदार मिळत नसताना अखेर स्थायी तहसीलदार म्हणून संदीप जी पानमंद नव्याने रुजू झाले आहेत.

सिंदेवाही तहसिल कार्यालयातील मागील तहसीलदार जगदाळे यांचे बदली नंतर आता पर्यंत चार तहसीलदार या तालुक्याला मिळाले आहेत. मात्र कोणतेही तहसीलदार स्थायी नसल्याने या तालुक्यातील अनेक प्रकरणे थंड बस्त्यात पडलेले आहेत. आता नव्याने स्थायी तहसीलदार म्हणून रुजू झालेले संदीप पानमंद यांचा कार्यकाळ जास्तीत जास्त राहणार असून रुजू झालेले तहसीलदार संदीप जी पानमंद हे स्थायी तहसीलदार म्हणून मिळाल्याने सिंदेवाही नायब तहसिलदार- तुमराम,अधिकारी – लोखंडे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी,तलाठी,सिंदेवाही तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी सिंदेवाही महसूल विभागाचे मंडळ अधिकारी चिडे, तोडसाम,गेडाम, परचाके व सिंदेवाही तालुक्यातील तलाठी झाडे,नागपुरे,आकरे, फुलझेले, अहिरकर,कन्नाके,श्रीरामे, इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये