गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदेशी दारू व चारचाकी कारसह ५ लाख ३८ हजारावर मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ०५/१२/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून आरोपी वैभव ज्ञानेश्वर किटे, वय ३० वर्ष, रा. पंजाब कॉलणी, वर्धा याचेवर आर्वी रोड, वर्धा येथे नाकेबंदी करून थांबवुन त्याच्या ताब्यातील वाहनाची पाहणी केली.

त्याचे वाहनात वेगवेगळया कंपनिच्या विदेशी दारूने भरलेल्या लहान मोठ्या शिश्या मिळुन आल्याने त्याबाबत त्यास विचारपुस केली असता त्याने सदर विदेशी दारू माल एम. पि. ट्रेडर्स कंळब, जि. यवतमाळ येथुन विकी करण्या करीता आणल्याचे त्यांने सागीतले, आरोपीचे ताब्यातुन सुजुकी कंपनिची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम. एच. ४९ यु ७०४२ व विदेशी दारूने भरलेल्या सिलबंद शिश्या असा एकुण जु. किं. १५,३८,२५०/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमुद आरोपी व एम. पि. ट्रेडर्स कळंब, जि. यवतमाळ चा मालक यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाँ सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशा प्रमाणे पोउपनी अमोल लगड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, मनिष कांबळे, पवन पन्नासे, प्रदिप वाघ, दिनेश बोथकर सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये