गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्पाच्या सेक्शन 4 चा मार्ग मोकळा – वेकोलीचे लेखी आश्वासनानंतर गावकऱ्यांत समाधान
कामगार नेते बबन उरकुडे ह्यांचे प्रकल्पग्रस्तांनी मानले आभार
चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
गोवरी सेंट्रल कोयला प्रकल्पाच्या सेक्शन 4 चा मार्ग मोकळा झाला असून 3 महिन्याच्या आत प्रस्ताव पाठवण्याचे लेखी आश्वासन वेकोली बल्लारपूर तर्फे कामगार नेते बबन उरकुडे ह्यांना देण्यात आले.
कामगार नेते बबन उरकुडे यांच्या नेतृत्वात गोवरी, गोयेगाव, माथरा, मूठरा येथील असंख्य प्रकल्पग्रस्त नागरिकांनी एकत्र येत गोयेगाव साईडिंग येथील मुख्य रस्ता अडवून धरत 2 तास काम बंद आंदोलन पुकारले.
ह्या आंदोलनाची धास्ती घेत क्षेत्रीय मुख्य प्रबंधक बल्लारपूर यांनी लेखी आश्वासन देत परिसरातील शेकतऱ्यांच्या प्रदूषण नियंत्रणाबाबत आणि सुरक्षेबाबत वेकोली कटीबद्ध असल्याचे मान्य केले. वेकोली अधिकारी चक्रवर्ती यांच्या मध्यास्तीने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य करण्यात आल्या.
याप्रसंगी तालुका समन्वयक प्रदीप येनूरकर, रमेश झाडे, युवानेते मारोती चन्ने, गोयगावचे सरपंच बंडू कोडपे, उपसरपंच स्नेहल पडवेकर, गोवरी ग्रामपंचायत सदस्य चेतन बोबाटे, अखिल लोनगाडगे, शुभम जूनघरी, मंगेश पहानपाटे, सूरज आलू, संतोष चन्ने, बाबुराव चन्ने, धीरज सातपुते, साईनाथ लांबट, प्रमोद पहानपटे, सूरज लांडे, गोलू ऊरकुडे, सचिन विद्ये, द्यानेशवर दरेकर, विननाथ जिवतोडे श्यासुंदर उईके, तेजराव पा. गौरकार रजकिरण पिपरे सुभाष वाढई, झाडे ह्यांचेसह शेतकरी उपस्थित होते.