आरोपीने जखमीच्या डोक्यावर काठीने केली मारहाण उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू
आरोपीला जन्मठेप ; ६ महिने कठोर कारावासाची शिक्षा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नमुद घटना दिनांक ०४/०७/२०१८ रोजी जलमी हा गावातील चौकात प्रमोद गेडाम यांचे दुकानासमोर उभा असतांना आरोपीने त्याला विनाकारण अफ्लील भाषेत शिवीगाळ करुन तु इथुन निधुन जा नाही तर मारुन टाकिन अशी धमकी दिली. आरोपीचे भितीमुळे जखमी तेथुन स्वतःचे घराकडे निघुन गेला व आरोपी मारहाण करेल या भितीमुळे तो स्वतःचे घरासमोर बचावाकरीता कु-हाड घेवुन उभा असतांना आरोपीने तेथे जावून त्यांचे डोक्यावर काठीने मारहाण करुन जखमी केले होते. जखमीचे डॉक्याला मुका मार असल्याने वैदयकिय अधिकारी यांनी तपासणी अहवालात सिम्पल इंज्युरी असा अभिप्राय देवुन पुढील अभिप्राय तज्ञ डॉक्टराकडुन घेण्याबाबत सुचित केले होते. सदर घटनेमध्ये तकारदार नामे कमलाकर शंभरकर, रा. धोंडगांव यांचे तकारीवरुन व सिम्पल इंज्युरीबाबत मेडीकल सर्टिफिकेटवरुन दिनांक ०५/०७/२०१८ रोजी अपराध कं. १६४/१८ कलम ३२४ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर जखमी यास मेडीकल कॉलेज, नागपुर येथे भरती केले असता त्याचा उपचारादरम्यान दिनांक ०५/०७/२०१८ चे रात्री दरम्यान मृत्यु झाला असुन मृतकचे मृत्यु प्रमाणपत्र व साक्षदाराचे बयानावरुन सदर गुन्हयात कलम ३०२, ३२४, २९४ भादंवि अन्वये आरोपीविरुध्द वरील नमुद कलमांप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला व त्याचे विरुध्द सबळ पुरावे मिळुन आल्याने आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा बी. पारगांवकर, हिंगणघाट यांचे न्यायालयात सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ होते.
सदर प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकिल म्हणुन दिपक एम. वैद्य यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले व त्यांनी शासनातर्फे एकुण १२ सरकारी साक्षदार तपासले व प्रखरपणे बाजु मांडुन युक्तीवाद केला आणि आरोपीविरुध्द गुन्हा शाबीत केला.
सदर प्रकरणात तपासी अधिकारी म्हणुन सपोनि एम. आर. ठाकुर, पोलीस स्टेशन, गिरड यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा केले होते. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस अंमलदार प्रेमदेव सराटे ब.नं. १५७२, पोलीस स्टेशन, गिरड यांनी सदर प्रकरणत विशेष परिश्रम घेतले.
कोर्ट विद्यमान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा बी. पारगांवकर, हिंगणघाट यांनी सरकारी पक्ष व आरोपी पक्षाचे युक्तीवाद ऐकुन आरोपी विरुध्द भादवीच कलम ३०२, ३२४, २९४ भादवी / अंतर्गत जन्मठेप, १०,०००/- रुपये द्रव्यदंड व ६ महिने कठोर कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.