ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीची घोषणा

महाराष्ट्र प्रदेश सह-संयोजकपदी शिल्पाताई (मीनाताई) देशकर यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेश संयोजक आचार्य तुषारजी भोसले यांनी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. त्यात प्रदेश सहसंयोजकपदी चंद्रपूरच्या शिल्पाताई (मिनाताई) देशकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत प्रदेश सहसंयोजक पदी प्रकाश महाराज जवंजाळ, राजेश देगलूरकर, संजयनाना धोंडगे, संजय जोशी यांची देखील निवड करण्यात आली आहे.

   शिल्पाताई (मिनाताई) देशकर यांच्याकडे या आधी पूर्व विदर्भ सह-संयोजक पद दिलेले होते. त्यांनी केलेले काम व निष्ठा बघून या वेळी प्रदेशाचे पद त्यांना देण्यात आले. तसेच मीनाताई देशकर यांच्याकडे लोकसभा निवडणूक क्षेत्र चंद्रपूर चे लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून दायीत्व देण्यात आले आहे.

   मा. देवेन्द्रजी फडणवीस, मा. चंद्रशेखर बावनकुळे, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा. हंसराज भैय्या अहिर आणि मा. तुषारजी भोसले यांच्या मार्गदर्शनात काम करणार असल्याचे शिल्पाताई (मिनाताई) देशकर यांनी सांगितले तसेच या नियुक्ती बद्दल धन्यवाद दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये