ताज्या घडामोडी

राजुरा येथे सर्व शाखिय सोनार समाजाची बैठक संपन्न – तालुका कार्यकारिणीची झाली घोषणा

राकेश चिलकुलवार तालुका अध्यक्ष तर संदीप पांढरे शहराध्यक्ष पदावर बिनविरोध नियुक्त

चांदा ब्लास्ट शहर प्रतिनिधी

आशिष यमनुरवार राजुरा

दिनांक १३ ऑगस्ट २०२३ रोज रविवारला राजुरा येथे सोनार समाज बहुउद्देशिय संस्था जिल्हा चंद्रपूर द्वारा. सर्व शाखेय सोनार समाज बांधवांची बैठक स्वयंवर मंगल कार्यालय येथे घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल चावरे अध्यक्ष/ संस्थापक सो. स. बहु. संस्था चंद्रपूर, सुमेध कासुलकर कोषाध्यक्ष, प्रवीण जुमडे ज्येष्ठ मार्गदर्शक, ॲड. प्राशिष ताठे, जिल्हाकार्याध्यक्ष संदीप चावरे, जिल्हा महासचिव, विलासराव लुथडे, शुभम उदापुरे, आशिष यमनुरवार जिल्हा सचिव तसेच राजुरा शहरातील सोनार बांधव व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व येणाऱ्या काळात शहरातील व तालुक्यातील सर्व शाखेतील समाज बांधवांना एकत्रित आणण्याचे कार्य करणार असे सर्व उपस्थित मान्यवरांनी हमी दिली. सुमेध कासुलकर, यांनी सोनार समाज बहुउद्देशिय संस्थेचे उद्दीष्ट व कार्य सर्वांना समजवून सांगितले तसेच प्रवीण जुमडे, संदीप चावरे, ॲड प्राशिश ताठे, प्रफुल चावरे यांनी समाज बांधवांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सचिव आशिष यमनुरवार व संदीप पांढरे यांनी केले.

सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत राजुरा तालुका व शहराची कार्यकारणी घोषित करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी राकेश चिलकुलवार, कार्यध्यक्षपदी संतोष भटपल्लिवार, उपाध्यक्ष गजेंद्र शेरेकर, सचिव अरूण बुटे, महासचिव प्रकाश मेडपल्लीवार, कोषाध्यक्ष गोपाल अडानिया, शहर अध्यक्ष पदी संदीप पांढरे व सचिव दिपक लुथडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सोनार समाज बहुउद्देशिय संस्था चंद्रपूर तर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये