ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- समग्र शिक्षा समावेशित शिक्षण पंचायत समिती जिवती अंतर्गत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाचे औचित्य साधून १० दिव्यांग विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, ट्रायसिकल,थ्री व्हीलर सायकल, श्रवण यंत्र वितरण करण्यात आले.

यावेळी गटविकास अधिकारी भागवत रेजिवाड अण्णाराव आडे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती जिवती, रामा पवार केंद्रप्रमुख केंद्र पाटण, नरेश शेंडे केंद्रप्रमुख केंद्र येल्लापूर, प्रतीक गुडेपवार समावेशित तज्ञ, दत्तात्रय गोतावळे विशेष शिक्षक, अंकुश राठोड, सुधीर खोब्रागडे विषय साधारण व्यक्ती आदींच्या उपस्थितीत दिव्यांगाना साहित्याचे वितरण करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये