Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बस स्थानक बंद झाल्याने बस उभ्या रस्त्यावर आणि प्रवाशी, अपघाताची शक्यता.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील बस स्थानक बांधकामास सुरुवात झाल्याने विश्राम गृहाची जागा बस स्थानाकाला दिल्याने विश्राम गृह आणि बस स्थानकासाठी नागभीड कर वशियांना किती काळ वाट पाहावी लागेल यांची हमी झाल्यानंतरच समजेल तोपर्यंत प्रवाश्याना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागेल. गेल्या पाच वर्षांपासून ही समश्या कायम आहे. निवडणूक जवळ आल्याने बस स्थानकाचे काम जोमाने सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे मात्र प्रवाश्याना जुन्या टी पॉईंट येथे बसेस थांबाविल्या तर चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली कडे जाणाऱ्या बसेसला सोईचे होईल. याबाबत बस स्थानक यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बस स्थानाकाचे काम जरी सुरु झाले.

मात्र, प्रवाशी खाजगी बसेसला फायदा होईल म्हणून जुन्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला याकरिता नागभीड पोलीस आणि नगर परिषद यांना सहकार्य करण्याचे सांगितले आहे असे सांगितले तरीपण आजमितीला खाजगी बस, वाहतूक आणि परिवहन विभागाच्या बसेस रस्त्यावर उभ्या राहत असल्याने प्रवा श्याना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते यावेळेस अपघात होण्याची दाट श्यक्यता आहे या करिता बस आगार प्रमुखांने घटना स्थळावर येऊन निर्णय घ्यावा अशी मागणी प्रवाशी संघटनेकडून केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये