Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला दिली मारण्याची धमकी

संचालकावर कारवाई करा

चांदा ब्लास्ट :——————————————————–

अतुल कोल्हे भद्रावती –
बाजार समितीच्या हद्दीत विनापरवाना व्यापाऱ्यांनी खेळा पद्धतीने शेतकऱ्याच्या मालाची खरेदी करू नये अन्यथा व्यापारावर कारवाई करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती संचालक मंडळाने घेतला यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका संचालकाने अश्लील व धमकीदार वक्तव्य करत एन्काऊंटर करण्याची धमकी दिल्याची तक्रार बाजार समितीच्या सचिवाने भद्रावती पोलिसात केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकाचे नाव अतुल जीवतोडे राहणार शेगाव खुर्द तर सचिव नागेश नामदेवराव पुनवटकर राहणार भद्रावती असे त्यांचे नाव आहे. दिनांक २८ ऑक्टोंबर ला व्यापारी प्रभाकर खोब्रागडे यांच्याशी सचिव नागेश पुरवटकर हे मोबाईल द्वारे बोलत असताना त्या व्यापाऱ्यांचा मोबाईल घेऊन अतुल जीवतोडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतलेल्या निर्णयाचा विरोध दर्शविला तथा सचिवाला अश्लील शब्दाचा वापर करत एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. खेळा पद्धतीने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करू नये असा प्रचार व प्रसार चालू आहे. या शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या संचालकावर कारवाई करण्याची तक्रार बुधवारला भद्रावती पोलिसात केली आहे.

बिपीन इंगळे – ठाणेदार भद्रावती
कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सचिवाची या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र फिर्यादी व संचालक मंडळाच्या सुचनेनुसार अजून पावेतो त्या गैर अर्जदारावर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये