ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खोटे कागदपत्राचे आधारे शेतीची विक्री करून फसवणूक

संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हकिकत याप्रमाणे आहे कि, घटना ता. वेळी व स्थळी, यातील आरोपीतांनी देवळी तहसिल अंतर्गत मौजा ढोणापुर येथील शेत सर्वे क्रमांक २६, २७, २८ व २९ हि शेती विकायची असल्याचे फिर्यादीस सांगुन बैठक केली. सदर बैठकी मध्ये आरोपी मोहन मेश्राम याने शेती विक्री करारनामा मध्ये शेतमालक सुराजी मकवाना यांचेकडुन दिनांक २२.०२.२०२२ रोजी ईसारपत्र केल्याचे फिर्यादीस दाखवीले त्यावरून फिर्यादी यांना खात्री झाल्याने शेती घेण्याचे ठरले. त्यावरून फिर्यादी यांनी सदर शेती विक्री करीता आरोपीतांना चेक व नगदी स्वरूपात रक्कम देवुन आरोपीतांनी संगणमत करून मुळ शेत मालक ऐवजी तोतया इसमांना उभे करून खोटे कागदपत्राचे आधारे फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून शेतीची विक्री करून एकुण ३४,८१,०००/- रूपयांची फसवणुक केल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद.

सदर गुन्हयाची क्लिष्टता बघता गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक सा. यांचे आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा, वर्धाकडे सोपविण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास प्राप्त होताच यातील आरोपीतांचा शोध घेणे सुरु केले असता गुन्हयात सामील आरोपीपैकी ०१ आरोपी हा शेगांव येथे व ०२ आरोपी हे नागपुर येथे असल्याचे माहीती प्राप्त झाली. त्यावरुन आम्ही आर्थिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथकासह शेगांव येथे रवाना होवुन गुन्हयातील आरोपी ०१) मोहन दयारामजी मेश्राम, रा. सानेवाडी, वर्धा याचा शोध घेवुन ताब्यात घेतले. तसेच यातील इतर दोन आरोपी (तोतया) मोबीन सॉले मोहम्मद खान, व (तोतया ) सुरेंद्र श्यामसुंदर महाद्वारे दोन्ही रा. नागपुर यांना नागपुर येथुन ताब्यात घेण्यात आले. तसेच तपासात निष्पन्न आरोपी शेख युसुफ शेख गुलाब रा. देवळी यास ताब्यात घेवुन गुन्हयात सर्व आरोपीतांना दि. ०२.११.२०२३ रोजी अटक केलेली आहे.

सदर गुन्हयातील आरोपी मोहन दयारामजी मेश्राम याने आरोपी शेख युसुफ शेख गुलाब याचे सोबत व ईतर आरोपीतां सोबत संगणमत करून फिर्यादी यांना शेत जमिनीचे मुळ मालक सुराजी मकवाना यांचे सोबत शेत जमीन विक्रीचे विसारपत्र झाल्याचे सांगुन फिर्यादी यांचे सोबत फसवणुक करण्याचे उद्देशाने सदर शेतीचा सौदा करून फिर्यादी यांचेकडुन नगदी व चेक स्वरूपात रक्कम स्विकारून फिर्यादीची फसवणुक केली आहे.

तसेच सदर गुन्हयात अटक असलेले आरोपी (तोतया) मोबीन सॉले मोहम्मद खान व (तोतया ) सुरेंद्र श्यामसुंदर महाद्वारे हे शेत जमीनीचे मुळ मालक सुराजी कर्णाजी मकवाना व मम्मुजी कर्णाजी मकवाना दोन्ही रा. कच्छ जिल्हा भुत, राज्य गुजरात असे असुन यांचे ठिकाणी तहसिल कार्यालय देवळी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष हजर राहुन ते शेत सर्वे नं २६, २७, २८, २९ चे मुळ मालक असल्याचे दर्शवुन बनावटी आधार कार्ड सादर करून फिर्यादीस शेत जमिनीची विक्री करून फसवणुक केली आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. कांचन पांडे, पोउपनि विवेक राउत, व स्टॉफ पोहवा. शैलेश भारशंकर, गजानन काळे, संतोष जयस्वाल, निकेश गुजर, स्वप्नील भारव्दारज, कुणाल डांगे, आशिष महेशगौरी, प्रतिक नगराळे, मनापोशि जोत्सना रोकडे, चालक मनोज झाडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये