ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्याची पुर्तता व्हावी

यासाठी महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने चंद्रपूर जिल्हा उप.प्रा.प.अधिकारी आनंद मेश्राम यांना निवेदन

चांदा ब्लास्ट

आज दि. २१/०८/२०२१ रोजी ऑटोसंघटनेचे सर्व पदाधिकारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन सादर केले. सर्व प्रथम नव्याने ऑटोरिक्षा चालकांवर पासींग करते वेळे बारकोड लावण्यास सक्ती करण्यात येत आहे. तसेच पुर्वी ऑटोरिक्षा चालकांना रेडीयम लावण्याचे २०० रू फी आकारण्यात येत होती. आता नव्याने रेडीयम व बारकोड यांचे ७०० रू. प्रती वर्षी आकारण्यात येत आहे. तसेच ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्या तात्काळ पुर्ण करण्यात याव्या असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री व पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा मा.ना. यांच्याशी ऑटोरिक्षा संघटनेचे शिष्टमंडळ दुरध्वनीवरून या मागणीची माहिती दिली. मा.ना. सुधीर मुनगंटीवार परिवहन आयुक्त यांचेशी बोलून ७०० रू. प्रती वर्षी आकारण्यात आलेला फी २५० रू. करण्यात आली. या शिष्टमंडळात ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष जाकिर शेख, जिल्हा सचिव सुनिल धंदरे, जिल्हा कोषाध्यक्ष रवि आंबटकर, महेश ढेकरे, अंकुश कोंराते, वासुदेव कुकडे, जनार्धन गुंजेकर, विश्वेश्वर राउत, राजू बडगे, राकेश पवार, प्रमोद हिंगे, विनोद शेलोकर, विजय बोरेकर, अरविंद उमरे, वामन टोंगे. प्रणीत वाटेकर, राकेश तिरणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये