ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शितोरयु कराटे इंटरनॅशनल ज्युनिअर बेल्ट परिक्षा व मार्गदर्शन शिबिर संपन्न

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व विविध बेल्ट वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

             सन 1967 पासुन देशातील सर्वात प्राचीन व नंबर एक कराटे स्कूल चा दर्जा प्राप्त- एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल, भद्रावती तालुका शाखा द्वारा शितोरयु कराटे इंटरनॅशनल ज्युनिअर बेल्ट परिक्षेचे आयोजन कराटे स्कूल चे तालुका अध्यक्ष मा. श्री. अतुल कोल्हे सामाजिक कार्यकर्ता, युवा पत्रकार व क्रीडा मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचोर्डि गुरुनगर भद्रावती येथे करण्यात आली.

            यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सौ. सरिताताई सुर नगर सेविका, नगर परिषद भद्रावती यांच्या तसेच एलन थिलक कराटे स्कूल चे महाराष्ट्र प्रमुख रेंशी दुर्गराज एन रामटेके, सामाजिक कार्यकर्ते मार्शल सुनील मेश्राम, सेन्सई सॅम मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.

शितोरयु इंटरनॅशनल कराटे चे जिल्हा परीक्षक राजुरा येथील सेन्सई बंडू करमनकर जिल्हा कोच – एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल चंद्रपुर, जिल्हा सह संघटक सेन्सई संदीप पंधरे, सचिव – कोरपना तालुका कराटे असोसिएशन यांनी सर्व विद्यार्थ्यांचे ज्युनिअर कराटे बेल्ट परिक्षेची ट्रेंनिग तसेच परीक्षा घेण्यात आली असुन त्यामध्ये कु. रुचिका येरने (पर्पल बेल्ट) तसेच क्रिश भोस्कर ,कु दिव्या गेडाम व कु आर्या कामरे (ग्रीन ब्लेट), कु नियाशा शाहु , कु चेरी गसकंटी (ऑरेंज बेल्ट), तर येलो बेल्ट परीक्षेत कु. नेणसी साहू, कु हिमागणी बर्धन, कु वैष्णवी जोशी, कु सांवी इंगोले, सिद्धांत यादव, गौरव जोशी, अर्थाव गेडाम, श्रेयस जीवतोडे, राज बोईनवर, विवेक वाटकर, यश पारखी, नैतिक ठमके, राज खापणे या कराटे पटूंनी परीक्षा पास केली.

            सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चे संस्थापक प्रमुख दाई सेन्सई डॉ मोसेस थिलक (प्राचीन भारतीय मार्शल आर्टस् व कराटे खेळाचे भीष्मपितामह), टेकनिकल डायरेक्टर सोशिहान नील मोसेस थिलक (कोईम्बतुर), डायरेक्टर हंशी पी सुनील कुमार (कोझिकोड,केरळ) अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष प्रा दुष्यंत नगराळे, उपाध्यक्ष श्री वाल्मिक खोब्रागडे, संस्थापक सेक्रेटरी रेंशी दुर्गराज एन रामटेके यांना दिलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये