Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सेवाग्राम रेल्वे स्टेशन, वर्धा येथुन मोटर सायकल चोरणारा आरोपी गजाआड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नमुद घटना ता. वेळी व स्थळी, यातील फिर्यादी हे त्यांचे मुलीला भोपाळ येथे जाणे असल्याने त्यांनी त्यांची स्वतःचे मालकीची जुनी वापरती एक होन्डा शाईन कंपनीची पांढऱ्या रंगाची जिचेवर लाल रंगाचा पट्टा असलेली मोटार सायकल क्र. MH-32 AN-3862 किंमत अंदाजे 30,000/- रू. ने घरून सेवाग्राम रेल्वे स्टेशनला आले. व त्यांची मोटार सायकल तिथे पार्कीगमध्ये ठेऊन मुलीसह भोपाळ येथे गेले. व दुसऱ्या दिवशी दिनांक 17/10/2024 रोजी सायंकाळी 05.00 वा. सुमारास सेवाग्राम रेल्वे स्टेशन वर्धा येथे परत आले असता त्यांना त्यांची मोटार सायकल क्र. MH-32 AN-3862 चेचीस नं. ME4JC739MJT009035 किंमत 30,00/- रू. ची मिळूण आली नाही. सदर मोटार सायकलचा आजुबाजुला शोध घेतला असता ती मिळून आली नाही. ती कोणत्यातरी अज्ञात ईसमाने चोरून नेली आहे. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अप. क्र. 1700/2024 कलम 303 (2) BNS प्रमाणे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदरचा गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरे वरून अज्ञात आरोपी नामे आकाश पुरूषोत्तम चव्हाण वय 27 वर्ष रा. बोरखडी (लका) ता. सेलू जि. वर्धा यास ताब्यात घेवुन पंचा समक्ष सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या गाडी बाबत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्यामधील मोटार सायक क्र. होन्डा शाईन कंपनीची पांढऱ्या रंगाची जिचेवर लाल रंगाचा पट्टा असलेली मोटार सायकल क्र. MH-32 AN-3862 किंमत अंदाजे 30,000/- रू. ही मोटार सायकल सेवाग्राम रेल्वे स्टेशन पार्कंग मधुन चोरली आहे. अशी कबुली दिली. तसेच पुलगाव बसस्थानक वरून 2) एक बिना नंबरची काळ्या रंगाजी लाल रंगाचा पट्टा असलेली बजाज कंपनीची पल्सर 220 जिचा चेचीस नंबर चेचीस नंबर- MD2A13EX7LCG42384 असा असुन इंजीन नंबर DKXCLG43228 असा असलेली किंमत अंदाजे 75,000/- रू. ही सुद्धा चोरल्याची कबुली दिल्याने सदर आरोपी पासुन एकुण जुमला किंमत 1,05,000/ रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर तसेच पोलीस स्टेशन वर्धा शहरचे ठाणेदार पो.नि. पराग पोटे, स.पो.नी. विकास गायकवाड, यांचे निर्देशनानुसार पो.स्टे. वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकाचे पो.हवा. राजेश राठोड ब.क्र.879, पो. अंमलदार सुरज जाधव ब.क्र. 1586, संभाजी मुंडकर ब.क्र. 1649, अशफाक शेख ब.नं. 1600 यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये