ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले श्रमदान
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.
याप्रसंगी महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्या स्मिताताई चिताडे, संस्थेचे सचिव धनंजय गोरे, उपप्राचार्य प्रा. प्रफुल्ल माहुरे तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.