ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरची लेक झाली महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाची सदस्य

चांदा ब्लास्ट

         बल्लारशाह तालुक्यात येणाऱ्या पळसगाव येथील छोट्याश्या गावातील जिल्हा परिषद शाळेतुन शिक्षण घेणाऱ्या शैला दादाजी वांढरे (चाफले) ह्या चंद्रपुर च्या लेकिने कीर्तिमान गाजवत आज त्या महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या सदस्य झाल्या आहेत.

     शैला दादाजी वांढरे (चाफले) ह्या कृषिभूषण पुरस्कृत स्व. दादाजी गोसाई वांढरे पाटिल यांची कन्या आहेत. शैला वांढरे ह्यांनी पळसगाव च्या जिल्हा परिषद शाळेतिल शिक्षण पूर्ण करून विधि क्षेत्रातील LLM आणि MBA चे उच्च शिक्षण पूर्ण केले, त्यांनी वकीली व्यावसायातून शेतकरी तसेच ग्राहकांच्या न्याय हक्का साठी नेहमी लढ़ा दिला, शैला दादाजी वांढरे ह्यांनी 11 ऑक्टोबर ला महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, खंडपीठ नागपुर येथे आयोग सदस्य म्हणून पदभार स्वीकारला आहे, शैला वांढरे यांनी न्यायिक सेवेत पदार्पण केले आहे.

विशेष म्हणजे शैला वांढरे ह्यांचे पति कैलाश चाफले यांनी सुद्धा चंद्रपुर च्या विधि महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केले आहेत. कैलाश चाफले हे नासिक येथे न्यायाधीश म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ति तावडे यांनी शैला वांढरे (चाफले) यांच्या शपथविधिच्या वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये