ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विकास विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

    लोकसेवा मंडळ विहीरगाव द्वारा संचालित विकास विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय विहीरगाव ता सावली जि चंद्रपुर येथे दि. 27 फेब्रुवारी 2025 रोजी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचन केलेल्या पुस्तकावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

       कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या कु. गराटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे थोर साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांचा साहित्याचा परिचय करून दिला. त्याचबरोबर मराठी भाषेचे महत्त्व अतिशय साहित्यिक वाणीतून व्यक्त केले. विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्वही याप्रसंगी सांगितले नंतर कविता वाचनही केले.

       डॉ. धर्मा गावंडे सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कवी कुसुमाग्रजांच्या चरित्रा वर प्रकाश टाकला मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. आणि साहित्य याविषयी माहिती दिली. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना साहित्याची ओळख व्हावी म्हणून स्वलिखित कवितेचे वाचन केले. कुसुमाग्रजांच्या स्मृतीला अभिवादन केले

   लोक सेवा मंडळाचे सदस्य श्री कुसुमाकर भाऊ वाकडे, पर्यवेक्षक कोकाटे सर, समर्थ सर यांनी कवी लेखक साहित्यिक यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

भाषण स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये प्रथम क्रमांक तनू चौधरी, द्वितीय क्रमांक अनुष्का कोलते, तृतीय क्रमांक स्वरा बानबले आणि प्रोत्साहनपर संजना मोहूर्ले , जानव्ही गायकवाड यांना बक्षीस देण्यात आले.

भाषण स्पर्धेचे परीक्षण श्री चौधरी सर , प्राध्या. उंदीरवाडे सर कु. स्वाती मुरकुटे मॅडम वेळाधिकारी म्हणून श्री चुधरी सर यांनी काम केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बोबाटे मॅडम आणि आभारप्रदर्शनाची जबाबदारी श्री राऊत सर यांनी पार पाडली.

      कार्यक्रमाला शाळेतील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षक- शिक्षिका वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये