ग्रामीण वार्तामहाराष्ट्र

‘कल्पतरुदिन’ समाजासाठी उत्कृष्ट सेवा देणारे मंगेश मातेरे यांच्या सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

  सिंदेवाही- कल्पतरू विद्यामंदिर सिंदेवाही येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांची जयंती समाजासाठी उत्कृष्ट सेवा देणाऱ्या दखलपात्र व्यक्तींच्या सन्मानाने साजरी करण्यात आली.

       कल्पतरूचे संस्थापक धनंजय बन्सोड यांच्या संकल्पनेतून एका दशकापासून हा उपक्रम राबविला जात आहे. समाजासाठी उत्कृष्ट सेवा देणारे पोलिस विभागातील मंगेश मातेरे सिंदेवाही, आरोग्य विभागातील रुपाली गुरुदास बोरकर रत्नापुर, नगर पंचायत सिंदेवाही येथिल सफाई कामगार पवन पेटकर आणि रोशन सांडेकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

      कल्पतरू विद्यामंदिर मध्ये उत्तम शिक्षण सेवा देणाऱ्या सौ. मनीषा बोनगुलवार आणि सौ. निरंजना मेश्राम यांचाही सत्कार करण्यात आला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कल्पतरूच्या सामाजिक उपक्रमाची माहिती धनंजय बन्सोड यांनी याप्रसंगी दिली.

दरवर्षी स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पाणपोई, 19 डिसेंबर “कल्पतरूदिन” रक्तदान शिबिर रोग निदान शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम, मा.गांधी जयंतीला दखल पात्र व्यक्तींचा सन्मान असे नानाविध प्रेरणादायी सामाजिक उपक्रम कल्पतरू परिवार राबवित असतो.

 “नरसेवा हीच नारायण सेवा”

 आहे, सेवा ही प्रामाणिक असावी असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

      मंगेश मातेरे यांनी पोलिस विभागातील अनुभव कथन केले आणि रुपाली बोरकर यांनी आरोग्य विभागातील माहिती याप्रसंगी सांगितली.

       या हृदयस्पर्शी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत मुल्लेवार प्रास्ताविक नाहीद शेख आणि आभार नीता कामडी यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पतरू विद्यामंदिर येथील शिक्षक,शिक्षीका, सेविका आणि वाहन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये