ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसी समाजाच्या मागण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन

अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना ओबीसी समाजाच्या मागण्याचे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक धनराज भाऊ मुंगले काँग्रेस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

चिमूर विधानसभा क्षेत्रातील ओबीसी समाजाच्या विविध मागण्याचे शासन दरबारी निवेदन देण्याचे ओबीसी प्रदेश संघटक धनराज भाऊ मुंगले यांनी अप्पर जिल्हाधिकारी चिमूर यांना दिले आहे यामध्ये मराठा समाजाला ओबीसी त प्रवेश देऊ नये, राज्य व केंद्र पातळीवर ओ बी सी ची जात निहाय जण गणना करा.,

ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर वसतिगृह सुरु करण्यात यावे, ओबीसी शेतकऱ्यांना इतर समाजाप्रमाणे शासकीय योजना देण्यात याव्यात, मुख्यमंत्रीरोजगार योजनेत ओबीसी समाजाचा समावेश करावा.

ओबीसी विद्यार्थ्यांना विदेशात जाण्याकरिता वीस लाख रुपये शिष्यवृत्ती लागू करावी, माडा, व सीडकोयोजनाचा ओबीसी समाजाला आरक्षण द्यावे या मागण्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य ओबीसी प्रदेश संघटक धनराज भाऊ मुंगले, राजू लोणारे, मोरेश्वर झाडें, अशोक वैद्य, प्रदीप तर्वेकर, राजूभाऊ दांडेकर, चंद्रशेखर गिरडे, घनश्याम येरुकर, मदन तराळे, गोवर्धन कुबडे, सतीश देव्हारे, राजेंद्र वंजारी, कमलाकर बोरकर व ओबीसी समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये