Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवयुवक गणेश मंडळ खैरगाव येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना तालुक्यातील खैरगाव येथे 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा बुवाबाजी संघर्ष समितीचे सहकार्य वाहक प्रभाकर मुके यांच्या जादूटोनाविरुद्ध कायदा व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने प्रबोधन व चमत्कार सादरीकरण करण्यात आले गावातील नागरिकांच्या समोर पाण्याने दिवा पेटवणे जळता कापूर तोंडात टाकने खाली हातातून चैन काढणे दोरीचा साप बनवणे असे अनेक प्रयोग दाखवून चमत्कार मागील वैज्ञानिक कारण या विषयावर प्रभाकर मुके यांनी नागरिकांना सांगितले.

तसेच या कार्यक्रमाला साहेबराव घुगुल पोलीस पाटील यांनी गावातील नागरिकांना अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवू नये असे सविस्तर अशी माहिती प्रेक्षकांना दिली यावेळी खैरगावातील नागरिकांनी अति उत्तम प्रतिसाद दिला प्रभाकर मुके यांनी सध्या गणपती व त्यानंतर देवीचे आगमन होत आहे.

तरी काही लोक अफवा पसरतात आणि त्या सोशल मीडियावर टाकतात अशा अफवांना कोणीही बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले याप्रसंगी खैरीगावातील सरपंच रोशन मरापे व पोलीस पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व बाल गोपाल व महिला यावेळी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये