Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव व सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने भाजपा वतीने रक्तदान शिबिर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

गणेशोत्सव व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या सेवा पंधरवाडा निमित्य भारतीय जनता पार्टी ब्रह्मपुरी च्या वतीने येथील भाजपा कारल्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. दरवर्षी ब्रह्मपुरी येथील भाजपा कार्यालयात गणेश चतुर्थीला श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केल्या जाते व गणेश उत्सव उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन या गणेशोत्सव व सेवा पंधरवड्यात करण्यात आले आहे. यातच २२ सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात अनेक युवकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला. यात महिलांनी सुद्धा रक्तदान करून गणेशोत्सव साजरा केला. डॉ. हेडगेवार रक्तपेढीने रक्त साठवण्याकरिता सहकार्य केले.

 या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये