ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालयाची चमू विभागीय स्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

क्रीडा व युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद यांचे विद्यमाने चंद्रपूर येथे आयोजित जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींचा खो खो स्पर्धेत पहिल्या तीन सामन्यात पोभुर्णा,राजुरा, कोरपना व अंतिम सामन्यात मूलच्या संघाचा,दुसऱ्या डावात 1 गडी बाद करत सावली तालुक्यातील प्रवीणभाऊ आडेपवार माध्यमिक विद्यालय निफ़द्रा च्या चमुने अंतिम सामण्यात विजय मिळविला.

हा संघ विभागीय स्तरावर चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यांना क्रीडा शिक्षक विनोद बोरकर, प्रदीप दोडके, माझी विद्यार्थी सुशील ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष गजानन यनगंदलवार, सचिव रवींद्र आडेपवार, शाळेचे संस्थापक विजय आडेपवार, मुख्याध्यापक रवींद्र कुडकावार तसेच शिक्षक पालक संघ,शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये