Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- तालुक्यातील ग्राम पंचायत लांबोरी अंतर्गत नारपठार येथील विकास कामाचे भूमिपूजन कार्यक्रम माजी उपसभापती महेश देवकते व सरपंच मोतीराम सिडाम यांच्या हस्ते संपन्न झाले. जन सुविधा योजनेतून सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांच्या माध्यमातून विविध विकास कामे मंजूर झालेले होते. सदर विकासकामे मंजूर व्हावे, यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच माजी आमदार संजय धोटे यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली होती.

या भूमीपूजन सोहळयाप्रसंगी जेष्ठ नेते तथा भाजपा अध्यक्ष केशव गिरमाजी, माजी उपसभापती महेश देवकते, कार्यक्रमाचे अध्यक्ष,सरपंच मोतीराम सिडाम, युवा मोर्चा तालुका अधक्ष गोविंद टोकरे, श्रीदास राठोड,माजी उपसरपंच रमेश पुरी,उपसरपंच कमलाकर जाधव, प्रा.पांडुरंग सावंत, ओमप्रकाश जाधव,जनार्दन श्रीसागर, सखाराम ठोंबरे,

जनार्दन श्रीसागर, सखाराम ठोंबरे, जीवनसिंग ठाकूर,चंद्र जाधव, संजय शिरसागर, नारायण ठोंबरे, विठ्ठल कदम राजेश पेंदोर,नंदू आत्राम,सुधाकर जाधव,बालाजी पांचाळ, गोविंद पांचाळ, शिवाजी कोहचाडे, परसराम कदम,माधव सीडाम, योगिंधर केवट यासह ग्राम पंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये