ताज्या घडामोडी

देवराव भोंगळेंनी मारली बाजी – राजुरा विधानसभेची उमेदवारी घोषित

भाजपच्या दुसऱ्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांचे नाव जाहीर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहिर केली असुन ह्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा पक्षाने केली आहे. जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातून माजी मंत्री स्व. संजय देवतळे ह्यांचे पुत्र करण देवतळे ह्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असुन राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी चार दावेदरांमधून अखेरीस युवा नेतृत्वास संधी देताना पक्षाने माजी जिल्हापरिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे ह्यांना आपले अधिकृत उमेदवार म्हणून पसंती दिली आहे.

राजुरा क्षेत्रात यंदा कधी नव्हे ते तब्बल चार उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटावर दावा ठोकला होता. पक्षाचे राजुरा क्षेत्रातून निर्वाचित झालेले पाहिले माजी आमदार संजय धोटे, काँग्रेसच्या तिकिटावर क्षेत्राचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सुदर्शन निमकर, जेष्ठ नेते खुशाल बोंडे व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे हे चारही नेते दंड थोपटून मैदानात उतरले होते मात्र पक्षाने भविष्यातील नेतृत्वाचा विचार करून दीर्घकालीन योजनेचा भाग म्हणून युवा नेतृत्वाला संधी देण्याचे निश्चित करून देवराव भोंगळे ह्यांना संधी दिलेली आहे.

मुळ घुग्गुस येथिल असलेले देवराव भोंगळे ह्यांच्यावर पक्षाने राजुरा विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी आपले बस्तान राजुरा येथे हलवून क्षेत्रात पक्षाच्या कामाची पुर्णवेळ जबाबदारी स्विकारली. क्षेत्रातील सर्वच चारही तालुक्यात जोमाने पक्षकार्य जोमाने सुरू केले. विधानसभा क्षेत्रातील जवळपास सर्वच गावे मागील चार वर्षांच्या कालखंडात त्यांनी पिंजुन काढली असुन राजुरा विधानसभा क्षेत्रात असे एकही गाव नसेल जिथे देवराव भोंगळे ह्यांना कुणी ओळखत नसेल अशी जोरदार तयारी त्यांनी केली.

सुरुवातीला पार्सल म्हणून संभावना होत असलेल्या देवराव भोंगळे ह्यांनी चार वर्षांत विविध कार्यक्रम तसेच उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने जनसंपर्क ठेवला तसेच सुधिर मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेची विविध शासकीय कामे ऑनलाईन पद्धतीने मोफत करून देऊन क्षेत्रातील जनतेची अविरत सेवा केल्याने त्यांच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढ होत गेली तसेच त्यांच्या धडाकेबाज कामामुळे त्यांच्या समर्थकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली ह्यांचे प्रत्यय विधानसभा निवडणुकीच्या निरीक्षकांच्या भेटीदरम्यान दिसुन आले त्यामुळेच त्यांची दावेदारी मजबुत झाली व त्यांना अखेरीस भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत उमेदवारी जाहीर केल्याचे बोलल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये