ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चैतन्य कॉलोनी, सुखकर्ता नगरी, साटोणे ले आऊट सावंगी (मेघे)च्या नागरिकांचा स्तुत्य उपक्रम

लोक वर्गणीतून रोडचें कामं

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    चैतन्य कॉलोनी, सुखकर्ता नगरी, सांटोणे ले आऊट सावंगी (मेघे) येथील नागरिकांना नागपुर बाय पास रोड वर मार्गक्रमण करण्यासाठी खुप बिकट परिस्थितीचा सामना करून मेन रोड वर यावे लागतं होतें मागील दोन वर्षापासून लोकांना खुप त्रास सहण करून रोड क्रॉस करावा लागतं होता अनेक महिला व पुरुष सदर ठिकाणीं गाडी घेउन पडलेत, अनेक लोकांना हॉस्पिटल मध्ये जाऊन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या, या समस्येचे निवारण करण्यासाठी कॉलनीतील अनेक लोकांनी ग्रामपंचायत सावंगी मेघे ला निवेदन दिले परंतु ग्रामपंचायत प्रशासन यांनी हे कामं सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हद्दीत येते असे सांगितले,शेवटी सदर कॉलनीतील नागरिकांनी लोकं वर्गणी आणि पुढाकार घेऊन गुणवत्ता पुर्ण सिमेंट, रेटी, गीट्टी यांचं योग्य प्रमाण वापरुन सिमेंट रस्त्याचे पक्के बांधकाम केले

  या कामासाठी प्रमोदभाऊ सुटे, मनिषभाऊ आदमाने, सुरेशभाऊ आगलावे,ऍड सौरभ वासेकर, प्रशांतभाऊ मुनेश्र्वर, दिगंबरजी वानी, नरेश नाईक, प्रेमानंद ताकसांडे ,अनिल सोनापितळे, रवींद्रभाऊ आगलावे, नितीनभाऊ कांबळे, बंडूभाऊ फुलमाळी,धम्माभाऊ शंभरकर,प्रेमदास ताकसांडे, सोनु थूल, सचिन उपाध्ये, संकेत थुल, बाबाराव आलोनीं, कमलेश तामगाडगे, पंकज खोंडे, सागर मेकॅनिक, राजु मुन, दिलिपभाऊ कठाने यांनी परिश्रम घेतले

  तसेच सदर कामासाठी राहुलभाऊ कांबळे यांनी 3 ट्रॅक्टर गीट्टी, बबन यादव यांनी 10बॅग सिमेंट तसेच दिलिपभाऊ उरकूडे यांनी योग्य मार्गदर्शन करून कामं मार्गी लावले

 सदर कामं पुर्ण झाल्यामुळे तिन्ही कॉलनीतील लोकांनी सदर कामासाठी ज्यांनी मदत केली यांचं अभिनंदन केलं, तसेच कॉलनीतील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.. ज्या लोकांनी ह्या कामासाठी स्वतः लोकं वर्गणी देऊन आपला सहभाग नोंदवला अश्या सर्वांचे मनापासून अभिनंदन..

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये