ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे ‘विद्यार्थी विज्ञान मंथन’ परीक्षेत यश

चांदा ब्लास्ट

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेकरीता तयार करण्यात नेहमीच अग्रेसर असते. विज्ञान भारती, विज्ञान प्रसार आणि एन.सी.ई.आर.टी. यांच्या संयुक्त विद्यामाने विद्यार्थी विज्ञान मंथन ही परीक्षा दरवर्षी सहावी ते अकरावी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोण लोकप्रिय करणे हा त्यामागील उद्देश आहे.

यावर्षी देखील विद्यार्थी विज्ञान परीक्षेचे आयोजन 27 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 या दरम्यान ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. त्यात एकुण 57 विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यापैकी 51 विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. यामध्ये इयत्ता दहावीतील ‘अर्जव देवीदास थिपे’ प्रथम मेरीट, ‘दिशांत पंडिले’, इयत्ता सातवी मधुन ‘जास्मीन परवीन’ द्वितीय मेरीट तर इयत्ता नववीतील ‘राशी रितेश जैन’, ‘अभिलेष अविनाश धात्रक’ ने तृतीय मेरीट येवून यश प्राप्त केले आहे. शाळेच्या यशस्वी वाटचालीत विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला.

शाळेच्या संचालिका स्मिता संजय जीवतोडे यांनी प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करीत म्हणाल्या की, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानीक दृष्टीकोन कायम जागृत राहणे तसचं निरीक्षण आणि तर्काच्या आधारावर विश्लेषण करण्याची पात्रता वृद्धींगत होण्यासाठी या प्रकारच्या परीक्षांची नितांत गरज आहे. त्यामुळेच विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे नक्कीच वळेल.

प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाचे श्रेय त्यांनी विद्यार्थ्यांवर अहोरात्र परीश्रम घेणा-या शिक्षकांना दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये