ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ऑटो रिक्षा असोसिएशन तर्फे 14 ला भद्रावती भोजनदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त स्थानिक ऑटो रिक्षा असोसिएशन तर्फे नवीन बस स्टँड येथे जयंती समारोह, भोजनदानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर यांच्या शुभहस्ते तर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अध्यक्षतेत होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार करण देवतळे, वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साठम, पोलीस निरीक्षक लता वाढिवे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी,माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, अहेतेशाम अली, शिवसेना नेते मुकेश जीवतोडे, रवींद्र शिंदे,मिलन आत्राम, एडवोकेट भूपेंद्र रायपुरे, सुशील देवगडे आदी मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे. उपरोक्त कार्यक्रमास व भोजनदानास मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान भद्रावती ऑटो असोसिएशनचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, सनमोहन केशवन, यशस्वी सहारे, प्रकाश मेंढे, राजू बालपप्पा, रमेश पाटील, राहुल रामटेके,संजय शेंडे, सरफराज पठाण, अझहर शेख,गणेश गजलेकर? शशि कवाडे आदींनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये