ताज्या घडामोडी

तीन पैकी एका बलात्कारी पोलिसावर अखेरीस गुन्हा दाखल – वर्षभरापासून सुरू होता विवाहितेवर अत्याचार

गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

सद् रक्षणाय खल निग्रहणाय असे ब्रीद वाक्य घेऊन मिरविणाऱ्या पोलीस दलातील बलात्कारी कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा निंदनीय प्रकार चंद्रपूर येथे उघडकीस आला असुन जवळपास वर्षभरापासून विवाहितेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलीस मेजर व इतर दोन कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार देण्यास गेलेल्या महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, चंद्रपूर पोलीस विभागातील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे शाखेत कार्यात पोलीस मेजर संजय अतकुलवार हा एका विवाहित महिलेचे मागील वर्षभरापासून जबरीने लैंगिक शोषण करीत होता, ह्यकामी इतर दोन पोलिसांचा सहभाग होता असा आरोप पीडित विवाहितेने केला आहे. अखेरीस तीनही पोलिसांचे लैंगिक शोषण असह्य झाल्याने विवाहिता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली असता सहकारी कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी त्या महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ सुरू होती अखेरीस घटना कळताच काही सामाजिक संस्थांच्या महिलांनी पोलीस ठाणे गाठुन गुन्हा नोंदविण्यास भाग पाडल्याने महिलेला तुर्तास तक्रार दाखल करण्यात यश आले असले तरीही सहकारी कर्मचाऱ्याविरुद्ध तपास योग्य पद्धतीने होईल का? व पीडितेला न्याय मिळेल का? असे प्रश्न निर्माण झाले आहे.
पिडीत महिलेला आरोपांनुसार सादर महिलेच्या पतीवर हत्येचा आरोप असुन पतीवर अधिकचे गुन्हे दाखल होऊ नये असे वाटत असल्यास व पतीची लवकर सुटका व्हावी असे वाटत असल्यास माझी इच्छा पुर्ण करावी लागेल अशी मागणी करून मेजर संजय अतकुलवार ह्याने पिडीत महिलेशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कालांतराने त्याच ठाण्यातील इतर दोन पोलिसांनीही त्या महिलेशी जबरीने संबंध ठेवल्याचाही महिलेचा आरोप असुन त्या महिलेकडे आरोपीच्या अश्लील व्हिडिओ कॉलचे स्क्रीन शॉट देखिल असुन महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना ते दाखविले असल्याचे कळले आहे.
ह्या पोलिसांची जबरी व शारीरिक शोषणाला कंटाळुन अखेरीस पिडीत महिला सायंकाळी 7 वाजता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार गेली मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे पिडीतेचे म्हणणे असुन अखेरीस सरिता मालू व सरस्वती दास ह्या महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले व महिलेला आधार दिला. अखेरीस जिल्हा पोलिस अधीक्षकांना घटनेची माहिती कळताच त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू तसेच उविपो अधीकारी यादव, ह्यांना दिलेल्या निर्देशानुसार दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन महिलेची चौकशी केल्यानंतर आरोपी मेजर संजय अतकुलवार ह्याच्यावर भादंवि कलम 1860 चे कलम 450, 376 (2) (अ) (1), 376,506 नुसार गुन्हा दाखल केला मात्र महिलेने आरोप इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही हे विशेष.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये