ताज्या घडामोडी

देवघाट नाल्यावरील रात्रौचे अवैद्य उत्खनन कुसळ गावकर्‍यानी पाडले बंद

जि आर आय एल कंपनी चे नियम बाह्य उत्खनन?

चांदा ब्लास्ट= प्रमोद गिरडकर

राष्ट्रीय महामार्ग राजुरा गोविंदपुर या रस्त्याचे काम जोरात सुरू असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिपत्याखाली जी आर आय एल या कंपनीने या परिसरात उत्खननाचा थैमान घातला असून जिल्हाधिकारी व शासनाच्या नियमबसताना मध्ये बांधून आपल्या मर्जीने मिळेल त्या ठिकाणी उत्खननाचा सपाटा सुरू केला आहे

जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या मान्यतेपेक्षा चार पट अधिक उत्खनन केल्या जात असून जिल्हाधिकारी यांच्या अटी व शर्ती बाजूला सारून 15 सप्टेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत तब्बल 75 दिवस रात्र व दिवसा उत्खनन करून महसूल सर्रास चोरी केल्या जात आहेयाबाबत नुकताच तहसीलदार कोरपना यांनीझालेल्या उत्खननाचे जलसंधारण विभागामार्फत मोजमाप करण्यात यावे अशा प्रस्ताव पाठवला मात्र दिवसाढवळ्या खनीकर्म विभाग व महसूल विभाग यांच्या समोरासमोर अविरत नाल्यामध्ये खोदकाम जोरात सुरू आहेप्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभागाच्या निकष व नियमाला डावलून देवघाट नाल्यातीलरेती दगड मुरूम सुरू करून नाल्यातील पाषाण उघड्या पाडल्या गेले आहे यामुळे नाल्या काठावरील आठ ते दहा गावाला उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई व पाणी पातळी भूगर्भात खाली गेल्याने व नाल्यामधील संपूर्ण पाण्याचा वेग थांबवण्याचे नियंत्रण करण्याची कोणतीही उपाययोजना नसल्यामुळे नालासपाट झाल्याने पाण्याचा विसर्ग भर वेगाने होऊन साठवणुकीची क्षमता व स्त्रोत नष्ट करण्यात आलेले आहे कंपनीला राज्य शासनाने ज्या अटीवर उत्खननाची धोरण ठरविले त्यामध्ये सुद्धा पायाभूत सुविधांची कामे व जलसंचयन कामे करण्याचे धोरण निर्णय असताना अशा प्रकारचे एकही काम राजूराचे कोरपणा तालुक्यातील नाल्यामध्ये उत्खनन करताना नियमाचे पालन केल्या गेले नाही कुसळ येथीलमोठ्या प्रमाणात उत्खनन करून वन्सडी ते कानडगाव 13 किलोमीटर या नाल्यातील मुरूम दगड रेती उत्खनन करण्यात आलेले आहे विशेष हे की रात्रपाळीला वाहतूक करताना पास दिल्या जात नाही तसेच प्रत्यक्ष तपासणी केली असता गावकऱ्यांना सर्व वाहनाच्या वाहतूक पाठीवर वेळ नऊ वाजताची स्थळ नमूद नाही तसेच रात्र कि दिवसासुद्धा नोंद घेण्यात आली नाही यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर वापर करण्यात येत असलेल्या स्थानिक परिसरातील उत्खननाचा महसूल चुना लावीत जी आर आय कंपनी उत्खनन करीत आहे यामुळे गावातील नागरिकांना रात्री वाहनाचा होणारा त्रास व रात्रभर होत असलेले उत्खनन याबद्दल गावातील नागरिकांनी कुसळ येथे रात्रला उत्खनन होत असलेले वाहनाला रात्र उत्खनन करण्याचा पास आपणास कोणी दिला 28 तारखेला ग्रामसभेने पेसा अंतर्गत असल्यामुळे उत्खनन बंद करण्याचा निर्णय घेतला असे असताना गावकऱ्यांच्या निर्णयाला धक्का देत जीआयएल कंपनीने दिनांक 2 12 2023 रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजता कुसळ गावालगत गावातील नागरिक एकत्र येऊन काम बंद पाडले व उत्खनन रात्रोला करण्यात येऊ नये अशी तंबी दिली तेव्हा रात्री अकरा वाजता दहा ते बारा ट्रक पोकलेन व जेसीबी याच्याने होत असलेली उत्खनन बंद करून चोरीने उत्खनन होत असल्याचे माहिती गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला दिली तसेच तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्यामुळे त्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला याबाबत तलाठी कोरपणा यांना सूचना देऊन रात्रचे उत्खनन का करण्यात येत आहे व याबाबत सक्षम प्राधिकरणाची मान्यता आहे का असे विचारण्यात केले असता तलाठी यांनी आम्ही त्याबाबतची चौकशी करून अहवाल तहसीलदार यांना दिलेला आहे अशी माहिती दिली मात्र गावातील बाबाराव श्रीराम अमोल कुंबरे वैभव किनाके कुणालातराम प्रकाश बोराते शुभम पंधरे अजय पुराते दिल्ली आत्राम विशाल तुळासे व इतर गावकऱ्यांनी परवानगी दाखवल्याशिवाय आम्ही वाहतूक करू देणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर कंपनीच्या संबंधितांनी संपूर्ण वाहन रात्री साडेबारा वाजता बंद करून आपल्या ठिच्यावर घेऊन गेलेमात्र ही कंपनी राष्ट्रीय कामासाठी म्हणून दिशाभूल करीत या भागातील भविष्यात नाल्यातील भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्यामुळे शेतकऱ्याचा सिंचन व पिण्याच्या पाणीचे अडचण निर्माण होणार आहे याबाबत खनिकर्म विभाग व महसूल विभागाने तसेच जलसंधारण विभागाने प्रत्यक्ष झालेल्या उत्खननाचे मोजमाप केल्याशिवाय आम्ही उत्खनन होऊ देणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली यामुळे जी आर एल कंपनीचा चोरीने सुरू असलेल्या उत्खननाचा कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये