ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केशनी हटवार आकाशवाणीवर

३ जानेवारी २०२४ ला होणार प्रसारण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

              भद्रावती येथील केशनी ज्ञानेश हटवार ह्यांनी लिहिलेल्या संवादात्मक रुपकाचे प्रसारण दि. ३जानेवारी २०२४ ला मुंबई आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८.४० मिनीटाने संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.

         ३ जानेवारीला सर्व सामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या शिक्षण प्रसारक, समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. सौ. केशनी हटवार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर त्यांच्या जयंतीनिमित्त संवादात्मक रुपक लिहिले आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दि. ३ जानेवारी २०२४ ला त्या संवादात्मक रुपकाचे प्रसारण सकाळी ८.४० मिनीटाने संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.

       या आधी सुद्धा केशनी ज्ञानेश हटवार यांचे अनेक कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित झाले आहेत. त्यात हॅलो सखी, वनिता मंडळ, मुलाखत, साने गुरुजी जयंती अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथील केशनी हटवार वि.सा. संघ, झाडीबोली साहित्य मंडळ, इनरव्हील क्लब भद्रावतीच्या सदस्या आहेत. या लेखिकेने लिहिलेले संवादात्मक रुपक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार असल्याने, परिसरातील साहित्य प्रेमी, रसिक मंडळी कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये