ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणपती पाहून रस्त्याने चालत असतानाच अज्ञात वाहनाने चिरडले

दोघांचा मृत्यू ; मूल मार्गावरील विरव्हा येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत गेडाम

सिंदेवाही : गावातील गणपती पाहून रस्त्याजवळ आलेल्या दोघांना एका भरधाव अज्ञात वाहनाने चिरडले. या भीषण अपघातात दोघांचाही मृत्यू झाला. ही घटना सिंदेवाही मूल मार्गावर सिंदेवाहीपासून सुमारे १० कि.मी. अंतरावरील नवीन विरव्हा येथे सोमवारी रात्री ७:३० वाजताच्या सुमारास घडली. दादाजी शिवराम सावसाकडे (वय ६५) व उदालक केशव हजारे (५०) दोघेही रा. सरडपार चक (नवीन विरव्हा) ता. सिंदेवाही अशी मृतकांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, सरडपार (नवीन विरव्हा) येथे गावात गणपती उत्सव असल्याने दादाजी आणि उदालक है।

गणपती पाहण्यासाठी आले होते. गणपती पाहून दोघेही सिंदेवाही- मूल मार्गावर असलेल्या गावातील बसथांब्याजवळ आले. रस्त्याच्या बाजूने चालत असताना अचानक भरधाव आलेल्या वाहनाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन गंभीर जखमी झाले. दोघेही रस्त्यावर पडून असताना सिंदेवाही पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहनातून दोघांनाही सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोहोचविले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे. सिंदेवाही प्रभारी पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये