ताज्या घडामोडी

ग्राहक पंचायतीने केले चंद्रपुरात झेंडा वंदन

ग्राहक पंचायतीचे कार्य आणि समस्यांवर झाली चर्चा

चांदा ब्लास्ट –

संपुर्ण देश भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करत असताना देशाची सर्वात उपेक्षित मात्र देशाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्राहकांच्या हिताच्या संरक्षणाचे महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने झंडा वंदनासाठी विशेषत्वाने आमंत्रित केले होते.

प्रजासत्ताक दिनाच्या ह्या राष्ट्रीय सणाच्या वेळी चंद्रपूर जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षा वैशाली गावंडे, सदस्य सचिन जयस्वाल व आयोगाच्या कर्मचाऱ्यांसह अखिल भारतीय ग्राहक पंचायत चंद्रपूरचे पदाधिकारी नंदिनी चूनारकर, संगीता लोखंडे, जितेंद्र चोरडिया, अण्याजी ढवस, हेमराज नंदेश्वर ,अशोक मुळेवार आवर्जुन उपस्थित होते. ह्यावेळी मुख्य कार्यक्रमानंतर आयोगाच्या अध्यक्षा व ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहक पंचायतीचे कार्य आणि समस्यांवर साधकबाधक चर्चा करून ग्राहकांच्या अधिकारांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध निर्णय घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये