ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीचा मंथन गेडाम वेट लिफ्टिंग स्पर्धेत विभागस्तरावर

जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत लोकमान्य महाविद्यालयाच्या खेळाडूने मारली बाजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नुकत्याच चंद्रपूर येथे जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हा स्तरिय शालेय क्रीडा स्पर्धेत येथील लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूने बाजी मारली असून तो आता विभाग स्तरावर खेळणार आहे.

वेट लिफ्टींग स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात मंथन गेडाम या खेळाडूने जिल्हा स्तरावर विजेते पद मिळविले. यानंतर तो विभाग स्तरावर चंद्रपूर जिल्ह्यचे नेतृत्व करणार आहे. मंथन गेडामचा सत्कार लोकमान्य कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार, उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे, क्रीडा विभाग प्रमुख विशाल गावंडे, प्रा.स्वाती गुंडावार आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. व मंथन ने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक अमोल आवळे, मार्गदर्शक प्रा. पवन गौरकार, प्रा. किशोर किरमिरे, प्रा. नितीन लांजेवार, प्रा.विजय गायकवाड आणि रवी नंदनवार यांना दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये