ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेतीची अवैध वाहतूक करणारे ५ ट्रॅक्टर जप्त 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस : येथील वर्धा नदीच्या चिंचोली घाट परिसरात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त होताच महसूल प्रशासनाने मध्यरात्री धाड टाकून ५ ट्रॅक्टर जप्त केले.

जवळपास ६ लाख रुपयाचा दंड वसुल करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही त्यामुळे रेती तस्कर सक्रिय झाले.

ही कारवाई नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, मंडळ अधिकारी प्रकाश सुर्वे, तलाठी नवनाथ गोडघासे, श्याम खरात, अनुप वगारे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये