ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वीज केंद्र प्रशासनातर्फे सदर कंत्राट लवकरात लवकर सुरु करण्याकरिता पाठपुरावा

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या पाईप कन्व्हेअर बेल्ट मधील कंत्राटी कामगाराच्या अनेक समस्या...

चांदा ब्लास्ट

       मेसर्स थायसेनकृप इंडस्ट्रीज इंडीया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला पाईप कन्व्हेअर बेल्टच्या कामाचे कंत्राट देण्यात आले होते. सदर कंत्राट संपुष्टात आल्याने कंत्राटदाराने कार्यरत कंत्राटी कामगारांना कामावरून बंद केले.

याबाबत महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार संघटने समवेत दि. 21/04/2023 दि. 25/06/2023, तसेच दि. 11/08/2023 रोजी औष्णिक विद्युत केंद्र चंद्रपुर प्रशासनासोबत तसेच दि. 11/08/2023 सहाय्यक कामगार आयुक्त चंद्रपुर यांच्या समवेत बैठका घेण्यात आल्या. सदर बैठकीत वरिल बाब (कंत्राटास मंजुरी देण्याबाबतचा अधिकार) महानिर्मिती मुख्य कार्यालयाशी निगडीत आहे असे सांगण्यात आले व चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनातर्फे सदर कंत्राट लवकरात लवकर सुरु करण्याकरिता मुख्य कार्यालयाशी पाठपुरावा करण्यात येत आहे.

जेणेकरूण संबंधित कंत्राटी कामगारांना त्या कंत्राटदारामार्फत येत्या काही दिवसात कामावर घेण्यात येईल. परंतु ह्या विषयाबाबत चंद्रपूर वीज केंद्र प्रशासनाबाबत कंत्राटी कामगारांमध्ये गैरसमज पसरविण्यात येत असून महानिर्मीती आणि वीज केंद्राची बदनामी करण्याचा तसेच कंत्राटी कामगारांची दिशाभूल करण्याचा व सदर कंत्राट सुरू करण्याबाबतचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसून येतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये