महात्मा गांधी विद्यालयात सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे दिनांक 31/08/2013 ला सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुधाकरराव अडबाले (नागपूर विभागाचे शिक्षक आमदार )होते.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे प्रभारी सचिव श्री धनंजय गोरे , उपाध्यक्ष श्री राहुलजी बोढे ,संचालक श्री विठ्ठलराव थीपे,संचालक श्री रामचंद्र सोनपितरे, संचालक श्री विकास भोजेकर, संचालिका श्रीमती उज्वलाताई धोटे, संचालिका कु. पुष्पाताई हिरादेवे, महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालय गडचांदूरचे प्राचार्य डॉ. शलेंद्र देव, महात्मा गांधी विद्यालय गडचांदूरच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता अनिल चिताडे, उप मुख्याध्यापक श्री अनिल काकडे, ,सत्कारमूर्ती पर्यवेक्षक श्री एच. बी. मस्की व सौ. माधुरी मस्की तसेच सत्कारमूर्ती शिक्षक श्री नरेंद्र आसेकर व सौ प्रतिभा आसेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक श्री अनिल काकडे यांनी केले , मुख्याध्यापिका सौ स्मिता चिताडे यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा आढावा सर्वांसमोर मांडला. याप्रसंगी संस्थेच्या व शाळेच्या वतीने श्री एच.बी. मस्की व श्री नरेंद्र आसेकर यांचा शाल श्रीफळ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे यांनी श्री मस्की व श्री आसेकर यांच्या कार्याबद्दल आपले मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना श्री मस्की व श्री आसेकर यांनी आपला कार्याचा जीवन प्रवास विशद केला.
अध्यक्षीय भाषणातून श्री सुधाकरराव अडबाले यांनी दोन्ही सत्कारमूर्तींबद्दल आपले विचार व्यक्त केले तसेच त्यांच्या वि.मा.शी.च्या कार्याचा सुद्धा उल्लेख केला.शिक्षकांनी तन-मन-धनाने विद्यार्थ्यांना त्यांचं आयुष्य घडवण्यास सदैव कार्य करावे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक श्री प्रशांत धाबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक श्री संतोष मुंगुले यांनी केले. कार्यक्रमाला सत्कारमूर्तींचे आप्तेष्ट, मित्र परिवार,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.