ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी सायन्स महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात दिनांक ५ सप्टेंबर रोज मंगलवारला शिक्षक दिनाचेआयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बी एस.सी.तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. काही विद्यार्थी शिक्षक बनले होते. शिक्षकांच्या कर्तृत्वाचे गुणगान करण्याचा हा दिवस असल्याने शिक्षकाकडून आतापर्यंत शिकविलेल्या धड्याचे वर्णन व महत्व यावेळी विशद केले.

ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचीही जबाबदारी मोठी आहे, त्यामुळे विद्या देणारा व विद्या अर्जन करणारा यांच्यातील नातेअतूट असतात.

याप्रसंगी विद्यार्थ्यांची भाषणे,कला प्रदर्शनी झालीत तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शिक्षकीपेशात यायचे असल्यास त्यांनी शिकवायचे कसे याचे प्रशिक्षण देणारे कोर्सेस करावे असे मार्गदर्शन श्री मनोहर बांद्रे यांनी केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देव सरानी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रा. चतारे व प्रा. घोडिले यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 भविष्यातील चांगल्या आयुष्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. आपले नाव मोठे करावे, असे त्यांना सांगण्यात आले. जीवनाच्या दिशा कळण्यासाठी शिक्षक किती आवश्यक आहे तसेच शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी महाविद्यालय स्तरावर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महाविदयालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये