ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालयात सोलर टेक्नॉलॉजिस्ट प्रशिक्षण शुभारंभ ६ ला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील कौशल्य विकास विभाग आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) चंद्रपूर यांच्या सौजन्याने उद्या दिनांक ६ सप्टेंबर रोज बुधवारला सकाळी १० वाजता सोलर टेक्नॉलॉजिस्ट प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित केला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा चे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कोषाध्यक्ष ए.बी.बोथले, एमसीईडी प्रकल्प अधिकारी संदीप जाने, सेवानिवृत्त प्राध्यापक धनराज आस्वले, डॉ.बी.बी.जांभूळकर, उद्योजक गिरीश पदमावार, सामाजिक कार्यकर्त्या माया नारळे, प्रशिक्षण संयोजिका पूजा अंबगुरवार उपस्थित राहणार आहेत.

तरी पालकांनी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे आणि कार्यक्रम समन्वयक डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये