ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अविनाश घोनमोडे शिक्षक पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट
जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत २०२३-२४ करीता जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. या शिक्षक पुरस्कारासाठी जुनासूर्ला येथील अविनाश नागनाथ घोनमोडे यांची निवड करून त्यांचा ५ सप्टेंबर रोजी स्थानिक दादासाहेब कन्नमवार सभागृहात सपत्निक सत्कार करण्यात आला.
        अविनाश घोनमोडे हे पंचायत समिती, सावली येथील जिबगाव केंद्रातील जि. प. उच्च प्राथमिक शाळा, लोंढोली येथे विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेली १७ वर्षापासून शिक्षक पदावर म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्षणी सुद्धा त्यांनी शाळेत राबवली आहे. तसेच शैक्षणिक विषयक विविध स्पर्धेचे त्यांनी आयोजन केलेले आहे. असे विद्यार्थीप्रिय असलेले मूल तालुक्यातील जुनासूर्ला या गावचे अविनाश घोनमोडे हे गावातील विकासासाठी सुद्धा प्रयत्नशील आहेत.
        एकंदरित याच सर्व कार्याची दखल घेत जिल्हा परिषद तर्फे त्यांना शिक्षक पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या कौतुकास्पद कार्यामुळे त्यांचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये