माजी सैनिक संघटने द्वारे ऑपरेशन सिंदूर रॅली काढून जवानांना सलामी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे माजी सैनिक संघटने द्वारे ऑपरेशन सिंदूर रॅली अमर जवान स्मारक ते बस स्थानक चौकापर्यंत काढण्यात आली व भारतीय सैन्य दलातील वानांना सलामी देण्यात आली.
माजी सैनिक संघटना – आमदार मनोज कायदे मित्र मंडळ व भारतीय जनता पार्टी सह विविध पक्षातील कार्यकर्ते नागरिक यांनी अमर जवान स्मारक येथून ऑपरेशन सिंदूर रॅली काढली .हातात तिरंगा ध्वज आणि भारताच्या विजयाचे व सैन्याचे विजयाचे फलक हातात घेऊन रॅली ही मुख्य मार्गावरून बस स्थानक चौकाकडे निघाली.भारत माता की जय,वंदे मातरम चा जयघोष करत बालाजी नगरी दुमदुमून गेली.
रस्त्यामध्ये असलेले डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा, अण्णाभाऊ साठे पुतळा या पुतळ्यास हार अर्पण करण्यात आले शहीद अब्दुल हमीद फलकावर पुष्पहार अर्पण करण्यात आले नंतर सदर रॅली ही बस स्थानक चौकात आल्यानंतर येथे माजी सैनिकांनी पाकिस्तान ध्वजाच्या प्रतिमेचे अग्नी लावून जाळले व पाकिस्तानचा निषेध केला.
भारतीय जवान जिंदाबाद चे नारे लावून भारतीय सैन्य दल यांना समर्थन केले व विजय कामगिरीबद्दल शुभेच्छा दिल्या . भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार यांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईचे याप्रसंगी अभिनंदन करण्यात आले .या रॅलीमध्ये माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार मनोज कायंदे,डॉक्टर सुनील कायंदे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा व माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे ,यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.भारतीय विजयाच्या सैन्यदल व केंद्रशासन आणि पंतप्रधान मोदी यांचे याप्रसंगी अभिनंदन केले.
सिंदूर रॅलीमध्ये माजी सैनिक संघटना आमदार मनोज कायदे मित्र मंडळ भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.