ताज्या घडामोडी

गोतस्करी करणाऱ्या आरोपींना बल्लारपूर न्यायालयाने दिली चपराक

चांदा ब्लास्ट

गोतस्करी करणाऱ्या आरोपींना बल्लारपूर न्यायालयाने मोठी चपराक दिली आहे. तस्करी केलेल्या ३६ जनावरांच्या देखभालीचे २०० रूपये प्रतिदिवस प्रमाणे ७ महिने १९ दिवसांचे तब्बल १६ लाख ७० हजार ४०० रूपये गौरक्षण सेवा मंडळ लोहारा या गोशाळेत जमा करण्याचे आदेश जारी केला आहे. त्यामुळे गोतस्करांचे धाबे दणाणले आहे.

बल्लारपूर पोलिसांनी तेलगंणात गोतस्करी करतांना बामणी फाट्यावर एक ट्रक जप्त केला. या ट्रकमध्ये तब्बल ३६ जनावरे कोंबून कत्तलसाठी नेण्यात येत होती. ही कारवाई १० जानेवारी करण्यात आली होती. कारवाई नंतर सर्व जनावरांची गौरक्षण सेवा मंडळ लोहारा या गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये