Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किशोरभाऊ पंदीलवार यांची बल्लारपूर दक्षता समितीच्या अध्यक्षपदी निवड

जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्याकरिता प्रत्येक तालुका/ नगरपालिका स्तरावर दक्षता समितीची स्थापना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गणेश टोंगे

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जास्तीत जास्त कार्यकाळ सेवा दिली असून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील भाजप नेते बल्लारपूर ग्रामीणचे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ पंदीलवार यांची बल्लारपूर तालुका अध्यक्ष पदावर काम करताना बल्लारपूर तालुक्यातील गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मोर्चे बांधणी गेल्या 30 वर्षापासून मोलाची कामगिरी बजावली सोबतच त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेऊन पक्ष वाढवण्याकरीता अपार कष्ट केले त्याच कष्टाचे चीज म्हणून किशोर भाऊ पंदीलवार यांना अन्नपुरवठा दक्षता समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याचे संधी वने संस्कृतीक व्यवसाय मंत्री चंद्रपूर गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री महोदयांनी किशोर भाऊ पंदीलवार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दक्षता समितीच्या अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली.

पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये पत्र क्रमांक 139/2023 मार्फत व माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी चंद्रपूर यांचे आदेश क्रमांक पू वी/कक्ष 13 दक्षता समिती/2023/145 हे पत्र बल्लारपूर तालुकास्तरावरील दक्षता समिती नियुक्ती करण्याकरता तहसीलदार बल्लारपूर यांचे कार्यालयात दाखल क्रमांक 2023/167 मार्फत माननीय श्री किशोर भाऊ पंदीलवार यांची बल्लारपूर तालुका दक्षता समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

उपरोक्त संदर्भा असा की शासन निर्णय क्रमांक एक नुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत वितरीत होणाऱ्या मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तूवर देखरेख ठेवण्याकरिता ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये सदस्य पद पण दिले असून शासनाच्या तरतुदीनुसार सर्व अध्यक्ष तथा सदस्य यांची चारित्र्य पडताळणी पात्रता व शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करून त्यांना नियुक्तीच्या दिनांक पासून तीन वर्ष अथवा त्यांच्या जागी नवीन समिती गठीत करण्यापर्यंत संधी देण्यात आली आहे

उपरोक्त संदर्भीय पत्रानुसार

दक्षता समिती अध्यक्ष: किशोर भाऊ पंदीलवार

सदस्य वैशाली राजू बुद्धलवार

सदस्य वर्षा श्रीनिवास संजूवार

सदस्य श्री दत्तू कोरवते

सदस्य श्री नरेंद्र देवतळे

सदस्य श्री रुपेश पोडे

सदस्य श्री नामदेव भोयर

यांची दक्षता समिती बल्लारपूर नियुक्ती करण्यात आली आहे सोबतच बल्लारपूर दक्षता समितीच्या अध्यक्षपदी श्री किशोर भाऊ पंदीलवार यांची वर्णी लागल्यामुळे भारतीय जनता पार्टी विसापूर तर्फे व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन किशोर भाऊ पंदीलवार त्यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते संजय पंदीलवार,संदीप पोडे, सुरज टोमटे,आकाश टोंगे, मनोज साखरकर,बंडू नांदे, गज्यानन पाटणकर,विद्या देवालकर,कुणाल लोखंडे,सुरेखा इटनकर, राहुल टोंगे, यश पंदीलवार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये