ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ज्येष्ठ नागरिक संघ महेश नगरतर्फे श्रावण झुला कार्यक्रमाचे आयोजन

सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस या स्पर्धेअंतर्गत महिलांसाठी विशेष कार्यक्रम

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजीत सुंदर माझे उद्यान व ओपन स्पेस या स्पर्धेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक संघ महेश नगर (ख्रिश्चन हॉस्पिटल जवळ) या ओपन स्पेस मध्ये २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ‘श्रावण झुला’ या कार्यक्रमाचे आयोजन विशेषतः महिलांसाठी करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी विनय गौडा व मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यात उपस्थीत राहणार असुन शहर प्रगतीस,महिलांचे योगदान याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

   मनपाद्वारे आयोजीत या स्पर्धेत शहरातील नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले असुन उद्याने व खुल्या जागांच्या स्वच्छतेसाठी हजारो हात सरसावले आहेत.   आपल्या परिसरात विरंगुळ्याच्या जागा निर्माण करण्यास व त्या स्वच्छ राहण्यास स्पर्धेच्या माध्यमातुन शहरातील नागरिक एकसंघ बनुन श्रमदानाचे कार्य करीत आहेत.

   आज जवळपास शहरातील प्रत्येक भागात एक उद्यान अथवा मोकळी जागा आहे, ज्या परिसरात उद्यान नवीन आहेत किंवा जेथील नागरिक जागरूक आहेत तेथील उद्यान अथवा मोकळी जागा यांची स्थिती उत्तम आहेत. मात्र शहरातील सर्वच उद्याने अथवा मोकळ्या जागा या सुंदर बनुन नागरिकांसाठी विरंगुळाच्या जागा बनव्यात यादृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे  ” सुंदर माझे उद्यान ” व ” सुदंर माझी ओपन स्पेस ” या २ स्पर्धा घेण्यात येत आहेत.
अनेक संघ सहभागी झाले असुन परिसरातील महिला व पुरुष मंडळी दररोज सुविधेनुसार वेळ काढुन संयुक्तपणे उद्यान अथवा मोकळी जागा स्वच्छ करत असुन परिसरात जनजागृती सुद्धा करीत आहेत. लोकसहभागातुन या जागांचा विकास व सौंदर्यीकरण होत असल्याने परिसरातील नागरिक सजग राहुन सदर जागा कायमस्वरूपी चांगल्या स्थितीत राहण्यास काळजी घेतील हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.

   प्रत्येक सहभागी गटांना सहकार्यासाठी मनपातर्फे नियंत्रक अधिकारी व नोडल ऑफीसर नेमण्यात आले असुन उद्यान अथवा खुल्या जागेत पाऊलवाट कुठे करावी,क्रीडांगण कुठे असावे,झाडे,खेळणी,बेंचेस,कचराकुंडी,शिल्प,कारंजे इत्यादींची उभारणी कुठे करावी याचे मार्गदर्शन त्यांच्यातर्फे केल्या जात आहे.यासाठी मर्यादीत स्वरूपात साधनांचे सहकार्यसुद्धा मनपातर्फे करण्यात येत आहे.

   जागृत नागरिकांद्वारे केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामांना मनपातर्फे पुरस्कार दिले जाणार असुन रोख रक्कम,ट्रॉफी आणि त्या वॉर्डच्या विकासकामांसाठी काही लक्ष रुपयांचा निधी सुद्धा देण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये