ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू-येळावेळी आर्वी रस्त्यावर चक्काजाम आंदोलन

ग्राम सडक योजनेतील रेहकी गावातील नाल्यावरील नाल्याचे काम अपूर्ण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

    रेहकी ता. सेलू येथील मा. मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेतील रेहकी गावातील नाल्यावरील पुलाचे काम पूर्ण न केल्याने सेलू-येळावेळी आर्वी रस्त्यावर दि. 25/08/2023 पासून चक्काजाम आंदोलन करण्याबाबतचा अर्जाचे अनुषंगाने दि. 23/08/2023 रोजी मौका पाहणी करण्यात आली सदर मौका पाहणीवेळी सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य, गटविकास अधिकारी व मा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी तसेच संबंधित कंत्राटदार मोक्यावर हजर होते.

रेहकी ते वडगाव या रस्त्याचे काम मा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रगतीत असलेल्या कामापैकी गावातील नाल्यावरील Slab Drain चे काम माहे ऑक्टोंबर, 2023 अखेर पुर्ण करुन देण्यात येईल तसेच या कामापैकी उर्वरीत क्रॉन्क्रीट नाली व रस्त्याचे काम क्रमशः करण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले व त्यानुसार संबंधित कंत्राटदार यांचे कडुन लेखी म्हणने नोंदविण्यात आलेले आहे.

तसेच दि. 23/08/2023 पासून सदरच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात सुध्दा करण्यात आलेली आहे. करीता आपण उपरोक्त प्रमाणे नियोजीत केलेले चक्काजाम आंदोलन स्थगीत करावे.

                                   …तहसिलदार सेलू

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये