ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हंगामी व बारमाई वनमजुराचे वेतन थकल्याने उपासमारिची पाळी.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

ब्रम्हपुरी वनविभागाच्या हद्दीत येणाऱ्या प्रादेशिक विभागातील वन मजूर कार्यरत आहेत. यात अनेक मजूर चारमाही, बारमाही असून अनेक महत्वाची कामे करीत आहेत. गेल्या पाच ते सहा महिन्यापासून केलेल्या कामाचा मोबदला न दिल्याने कौटुंबिक व्यवस्था कोल मंडली असून आज ना उद्या आपल्याला मोबदला मिळेल अशी आशा बाळगुन उधार उसने घेऊन जीवनाचा कठीण समस्या समोर नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागाईचा डोंगर वाढत असताना हातावर आणून पानावर खाणाऱ्या वन मजुराचे वेतन न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडले आहेत.

वन मजूर वन विभागात महत्वाची कामे नित्यानियमाने करीत असून त्याचा दर महिन्याला मोबदला देण्यात यावा जेणेकरून त्याचे उदर निर्वाह आणि कौटुंबिक जीवन चांगले जगता यावे मात्र गेल्या ५ते ६महिन्यापासून वन मजुराचे वेतन न मिळाल्याने उपासमारीची परिस्थिती उद्धभविली आहे. याकडे वन मंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी वन मजुराच्या थकीत वेतन देऊन समश्या दूर करावी अशी मागणी वन मजूर संघटनेने केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये