आई काळुबाई दरबार व त्रिमूर्ति नागद्वार स्वामी जोडीवाले बाबा सेवा मंडळा तर्फे नागपंचमी उत्सव संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे
आई काळुबाई दरबार सेवा समिति भद्रावती व त्रिमूर्ति नागद्वार स्वामी जोडीवाले बाबा सेवा मंडळ नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही भद्रावती येथिल गांधी चौकात नागपंचमी चा उत्सव उत्साहात संपन्न झाला.
ऊत्सवाची सुरुवात नगरसेवक निलेशभाऊ पाटील व नगरसेविका सौ अनिताताई प्रमोद गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितित आई काळुबाई दरबार सेवा समिति येथुन भद्रनाग मंदिरापर्यंत पालखीची पदयात्रा मिरवणुक काढुन करन्यास आली. भद्रनाग मंदिरात कढईची पुजा करन्यात आली. नागमंदिर ते गांधी चौक पर्यंत पालखी मिरवणूकीत अनेक महिला, पुरुष भक्तगणांचा समावेश होता .ॐश्री साई भजन मंडळ नागपुर यांच्या भजनात भक्तगण वाजत गाजत रस्त्याने नाचत होती तर शंकर पार्वतीची हुबेहुब प्रतिकृति मिरवणूकीचे आकर्षण ठरत होती.
पालखीची मिरवणूकीचे गांधी चौकात आगमन झाल्यावर धार्मिक मंचावर पालखी ठेवन्यात आली . ॐ श्री साई भजन मंडळ रजनीताई नाकाडे व संच नागपुर यांनी दिवसभर भक्तिमय शिवभजने सादर केली.विषेश म्हनजे सोमवार च्या दिवशी नागपंचमी आल्यामुळे समिति तर्फे भद्रावती नगरीत यात्रेत आलेल्या संपुर्ण भक्तांना साबुदाना खिचड़ी व मसाले भात महाप्रसादाचे वितरण करन्यात आले.
दिवसभर चाललेला हा उत्सव –
आई काळुबाई दरबार सेवा समिति भद्रावती यांनी अथक परिश्रम घेवून यशस्वीपणे पार पाडला.सदर समिति चे अध्यक्ष संदीप श्रावण पेंदाम भद्रावती, उपाध्यक्ष राजु धनराज पेंदाम वरोरा, सचिव प्रफुल्ल बाळाजी पत्रकार घोडपेठ, सहसचिव काजल संदिप पेंदाम भद्रावती, कोषाध्यक्ष आशिष निलकंठ उमरे एकार्जुना वरोरा,संघटक नितिन गणेश म्हसे बाबुपेठ चंद्रपुर . सदस्यगण :- किशोर परशुराम वांढरे, योगेश तुळशीराम ठवरे, अनिल रामदास गोहोकार,अजय वसंता राजनहिरे, गिता निलेश कडाम, पांडुरंग रामदास डूडूरे, जितेंद्र विठ्ठल पेंडलवार, सरस्वती बबन पेंदाम, कल्पना किशोर गट्टूवार, सुनंदा लक्ष्मण मांढरे, निलेश बालाजी कडाम, नितीकेश सुभाष कडूकर, शैलेश वाभिटवार, अभिषेक ढोबळे नागपुर, सागर इंगळकर वर्धा यांचे योगदान आहे .
किर्ति ताई पांडे, नागेंद्र ऊर्फ बंडु चटपल्लीवार, जितेंद्र गुलानी यांनी सेवा प्रदान केली.