ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘स्वर गंधार ‘तर्फे राष्ट्रभक्ती पर गीत गायन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्वर गंधार, संगीत अकॅडमी तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रभक्ती पर गीतांचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
    अकॅडमी चे संचालक अनिरुद्ध दळवी,  राशी दळवी यांनी हे आयोजन केले होते.
प्रमुख अतिथी म्हणून कोकाटे, लांडे, सुभाष पाथ्रीकर, नीरज लांडे, प्रतिभा पाथ्रीकर उपस्थित होते. सरस्वती पूजन, दीप प्र्वजलन करून कार्क्रमाला प्रारंभ झाला. अनिरुद्ध दळवी यांनी प्रस्ताविकातून अकॅडमी च्या आठ वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला.
     विद्यार्थी व काही मान्यवर गायकांनी गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन, कलाकारांचा सत्कार करण्यात आला. अतिथीनी शुभेच्छा देऊन संगीत क्लास च्या वाटचालीचे अभिनंदन केले.
संचालन मुकुंद पाटील यांनी व आभार प्रदर्शन अभिषेक पाथ्रीकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये