ताज्या घडामोडी

दुचाकी स्वाराला वाचविण्यासाठी कार घुसली घरात.

महिला चालवीत होते चार चाकी वाहन

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे

नागभीड नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या भिकेश्वर गावाजवळील चौकात भिकेश्वर येथील डेबू कुत्तरमारे आपली दुचाकी वाहन हिरो होंडा क्रमांक एम एच ३४कयू ३५७५ने विलंम रस्त्याकडे जात असताना नागभीड कडून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच ४९बी के ५३११ वाहन चालकाने वाचावीण्याच्या नादात स्वतःचे वाहन नियंत्रित करताना रस्त्याशेजारी असलेल्या घरात घुसली मात्र जीवित हानी झाली नसल्याचे समजते. चार चाकी वाहनात एअर बॅग असल्याने चार चाकी वाहन महिला चालवीत असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले. पोलिसांनी दुचाकी वाहन ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु केल्याचे समजते. सदर घटना साडे पाच वाजता घडल्याचेही पोलीस स्टेशन येथून समजते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये