ताज्या घडामोडी

घराचे खोटे दस्ताऐवज तसेच खोटे मृत्युपत्र तयार करून फसवणुक

सदर प्रकरणात वर्धा पोलीसांनी फिर्यादीस परत मिळवून दिले त्याचे हक्क..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी श्री दिनेश व्दारकाप्रसाद जोशी (शर्मा), वय ६५ वर्ष, रा. वाराशिवनी, जि. बालाघाट म.प्र. यांचे वडीलोपार्जीत वर्धा येथील मारवाडी मोहल्ला पटेल चौक, वर्धा येथील घराचे आरोपीतांनी संगणमत करून, कट रचुन बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून व बनावट मृत्युलेख तयार करून सदरचे घर हडप करण्याचे उदेशाने फिर्यादी यांची फसवणुक केल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप.क्र. १४२९ / २०२२ कलम ४२०, २०९, १९८, १८३, ४६६, ४६७, ४७१, १२० ब ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता..

सदर गुन्हयाचा सखोल तपास करण्यात आला असून तपासात बनावट दस्ताऐवजाची प्रबंधक कार्यालय, भुमिअभिलेख विभाग यांचेकडुन पडताळणी करण्यात आली तसेच नगर परिषद वर्धा येथे उशीरा नोंदणी करण्यात आलेल्या बनावट मृत्युच्या नोंदींची जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जन्म मृत्यु जिल्हा रजिस्टार यांचेकडुन पडताळणी करण्यात आली तसेच इतर कागदपत्राची तपासणी करुन, पाठपुरावा करुन माहिती घेण्यात आली असता तपासाअंती सदर दस्ताऐवज हे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. सदर प्रकरणी फिर्यादी यांची मालमत्ता त्यांना परत मिळवून देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली. सदर गुन्हयात आतापावेतो ४ आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयात सामील असलेल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत व त्यांना लवकरच गुन्हयात अटक करण्यात येईल.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक, श्री कांचन पांडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक पवन भांबुरकर, पोलीस अंमलदार गजानन काळे, संतोष जयस्वाल, शैलेश भालशंकर, आशिष महेशगौरी, प्रतिक नगराळे सर्व नेमणुक आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

१. अखिल सराफ रा. मारवाडी मोहल्ला वर्धा

२. मो.रफिक अन्सारी रा. मोमीनपुरा नागपुर

३. अयाज / बबलु रफिक शेख रा. खडसे ले आउट वर्धा

४. कमलाकर नारायणराव सायंकार रा. साई नगर वर्धा

५.विशाल देविदास थुल रा. आनंद नगर वर्धा

६. फईम अफजल अब्दुल अजीम अन्सारी रा. मोमीनपुरा नागपूर

७. राजेश श्यामालाल जयस्वाल रा. पोदार बगिचा वर्धा

८. मंगेश तिवस्कर रा. वर्धा.

अटक आरोपी १, ३ ४ व ५

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये