ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वायगांव : ‘देशाभिमान निर्माण करणे व स्वातंत्र्याची ज्योत मनामनात रुजविण्याकरीता ‘ ‘हर घर तिरंगा’ अभियान स्थानिक यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने वायगांव व परिसरातील गावांमध्ये राबविण्यात आले.

प्रभारी प्राचार्य कॅप्टन मोहन गुजरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय छात्र सेना पथक, स्काऊटस, गाईड्स, रोव्हर्स, रेंजर्स, राष्ट्रीय सेवा योजना पथक तसेच रोटरी क्लब द्वारा संचालित इंटरॅक्ट क्लब स्वयंसेवकांनी 200 घरांना भेटी देऊन लोक सहभागातून तिरंगा फडकविला.
छात्र सैनिक व स्वयंसेवकांना प्रोत्साहन देऊन सदर उपक्रम यशस्वी करण्याकरीता जेष्ठ अध्यापिका कल्पना कोल्हे, अपर्णा ढवळे, सुरेश रोठे, स्मिता भोयर, गाईड कॅप्टन प्रेमलता कोहळे, वैशाली श्रीरामे, जनार्दन मते, आश्विन भोगांडे, रेखा आत्राम, वैशाली फरताडे, प्रा विनोद मेंढे, प्रा. शैलेन्र्द निकोसे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. मंगेश भोमले, प्रा दिनेश भगत, प्रा. स्वाती अवचट व प्रा. भाग्यश्री गरूड यांनी पथकांचे नेतृत्व केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये